समाजकारणातील महिलांची भागिदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी

3401
  • प्रा. प्रेरणा होनराव । लातूर

पल्या देशातील सुसंस्कृत, मानव्यवादी, दक्ष, आणि विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे असते. यामध्ये आपल्या कुटूंब व्यवस्थेतील महिलांचेही खुप मोठे योगदान लाभत आलेले आहे. समाजकारणातील महिलांची भागीदारी उज्वल हिंदुस्थानची पर्वणी ठरत आहे. मग यामध्ये स्व. इंदिरा गांधी असतील किंवा विद्यमान सरकारमधील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज किंवा संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी आपल्या कार्यकुशलतेतून हे सिध्द केलेले आहे. आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा लेखप्रपंच

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या हिंदुस्थानात मधल्या काळात महिलांची मोठ्या प्रमाणात नैतिक हानी केल्याची उदाहरणे आहेत. त्याची कारणे पाहिली असता या काळात देशावर मुघलांची परकिय आक्रमणे होऊन महिला आणि बालकांना सावज करुन आक्रमणकर्त्यांनी यांच्या दुर्बल्याचा फायदा घेऊन सत्तांतरे केली. यानंतर अनंत काळापर्यंत त्यांनी हिंदुस्थानावर राज्य करुन द्रविड संस्कृतीपासून पुरुषाच्या समान अधिकार असलेल्या स्त्रीला घोषात ठेऊन दुय्यम दर्जा दिला. इतिहासाचा भाग सोडला तर पुढे ही स्त्रीच्या शारिरीक दुर्बलतेचे भांडवल करुन पुरुषाधिष्ठीत संस्कृती वृध्दींगत होत गेली. यामुळे स्त्रीयांना फक्त चूल आणि मुलांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले. असे असताना सुध्दा आमच्या संस्कृतीत राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवून आपले प्राबल्य दाखवून दिले. राणी लक्ष्मीबाई, आहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक क्रांती घडवून स्त्रीत्वाला बलशाली इतिहास दिला आहे. त्यानंतर अतिशय धडाडीच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधीनी आपला कार्यकाळ गाजवला. त्यानंतर प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांच नाव घेतलं जातं. तसेच अकॅडमीक क्षेत्र असेल किंवा अन्य अनेक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर किरण बेदी यांनी ही आपली विशेष ओळख निर्माण केलेली आहे.

८ मार्च १९४३ साली मुंबईत पहिला महिला दिवस साजरा झाला आणि तो आजपर्यंत अविरतपणे चालूच आहे, ही बाब तुम्हा आम्हांसाठी अभिमानाची आहे. याचसाठी मांडलेल्या विचारांत महिलांची बाजू मांडताना असे सांगावेसे वाटते की, पूर्वी महिला विषयी फक्त चूल आणि मूल असं म्हटलं जायचं. महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूल बाळ सांभाळायचं एवढंच तीच काम अस समजलं जायचं. पण आज परिस्थिती बदललेली आपल्याला दिसतेय. पूर्वी जिथं महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसं वागल्या तर त्याबाबत कमीपणा समजला जायचा, त्याच महिलांच्या हाताखाली आज हजारोंच्या संख्येत लोकं काम करतांना आपल्याला दिसताहेत. म्हणून तर आज या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय. खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली खरंच हि एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. व प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आई वडील करतांना आपल्याला दिसतात. बदलत्या काळात आणि जागतिक पातळीवरील औद्योगिकरणाच्या स्पर्धेत हिंदुस्थाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी या क्रांतीकारी विकासात महिलांनी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून औद्योगिक आणि आयटीक्षेत्रात सुध्दा नेत्रदिपक यश प्राप्त केलेले आहे. जागतिक अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक विख्यात कंपन्यांच्या सीईओ पदांपर्यंत महिलांनी मजल मारलेली असून त्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली व गुणवत्तापूर्वक स्थरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. त्याशिवाय चंद्रयान मोहिमेत पहिल्यांदा सहभाग घेणारी कल्पना चावला असेल किंवा याच माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला म्हणून मान मिळवणारी सुनिता विल्यम्स असेल यांनी वैज्ञानिक क्षेत्रात ही आपला ठसा उमटवलेला आहे. आज महिला स्वतंत्ररित्या जगत आहे त्यांचे निर्णय त्या आज स्वतः घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलट पासून तर मेट्रोच्या पायलट पर्यन्त त्या आज आपल्याला पाहायला मिळतात. पिटी उषा, हिंदुस्थाच्या मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. पीव्ही सिंधू , किरण बेदी या पण सर्व महिलाच होत्या आणि महिला असून त्या त्यांच्या ज्या त्या क्षेत्रात त्यांनी नांव कमावलं आणि त्यांच्या पासूनच प्रेरणा घेत व त्याना डोळ्यासमोर आदर्श ठेऊन आज महिला आज सतासामुद्रापार झेंडा फडकवत आहेत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

एकूणच काय तर समाजातील मनोरंजनाच्या क्षेत्रापासून ते राजकारण, उद्योग आणि रणभूमिवरील प्रत्यक्षात युध्द करण्याचे काम असेल अश्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रीने आपले कतृत्व सिध्द केलेले आहे. अगदी वयाच्या १९ व्या वर्षांपासून राजकारणात सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज यांनी भाजपाच्या अनेक महत्वाच्या पदावर सक्रिय राहून आपले प्रभुत्व सिध्द केलेले आहे. त्याशिवाय भाजपाच्या कार्यकारीणीतील लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पुनम महाजन, उमा भारती , आणि पंकजा मुंडे, प्रितम मुंडे असतील त्याशिवाय अन्य पक्षातील महिला जसे की, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, सुप्रिया सुळे यांनीही राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.

देशातील विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून आपले कर्तव्य बजावणार्‍या महिला अधिकारी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजबांधनीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकांना सुधारण्यासाठी घडपड करणार्‍याही सिंधुताई सपकाळ सारख्या मातृत्व जोपासणार्‍या महिला ही मानव जातीसाठी एक आदर्श घडवत आहेत. जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलाच काम किंवा हे महिला करू शकत नाही असं समजलं जायचं तिथं आज महिला आपल्या देशाच्या सीमाचं रक्षण करतांना आपण पाहतोय. पूर्वी ज्या महिला घराबाहेरही निघायला घाबरायच्या आज त्याच महिला परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालतांना आपल्याला दिसत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त आज महिलांचा जिकडे-तिकडे सत्कार होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून बाकी काहीहि असो ८ मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही, असं मला वाटतं कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. आज महिला घराबाहेर पडायला किंवा कोणतेही आव्हाने पेलण्याच काम अगदी बिनधास्तपणे व्यवयासय किंवा नोकरी करायला थोडंही लाजत नाहीत. समाजाला घाबरत असतील त्यांना सुद्धा या यशस्वी महिलांचा सत्कार व सन्मान पाहून त्यांच्या मनात सुद्धा वाटेल की या महिला करू शकतात तर आपण का नाही असं असा प्रश्न त्या करू लागती इतर माहिलांसारख्या त्या पण घराबाहेर पडतील आणि त्यांना ज्या गोष्टी मध्ये रस आहे त्या गोष्टी त्या करू लागतील. याच वाटचालीवर सध्या देशात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. स्त्रीयांनी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा निर्माण करुन आपले अस्तित्व सिध्द केलेलंच आहे त्याशिवाय पुरुषांपेक्षा संयमी आणि गुणवत्तापूर्ण कार्य करत ३० वरुन प्रत्येक क्षेत्रात ५० टक्के आरक्षण प्राप्त केलय ही बाब महत्वाचीच समजावी.

शेवटी असं ही सांगावस वाटतं की, विद्यमान सरकारने सत्तास्थानात अनेक निर्णायक व महत्वांच्या पदावर स्त्रीयांना स्थान देवून त्यांच्याबद्दलची अस्मिता जागृत केलेली आहे. चूल आणि मुल ही चौकटी बाहेर पडलेली आजची महिला देशाच्या अनेक सर्वच नामांकित क्षेत्रात अगदी धाडसानं दमदार नेतृत्व करत आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात आपले प्रभावी कौशल्य सिध्द करत आहे. त्याशिवाय प्रशासनिक, राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यात पारदर्शकता निर्माण करण्यात पुरुषांपेक्षा स्त्रीया सरस ठरत असून देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर सुध्दा निर्णायक बाबींमध्ये स्त्रियांचे योगदान सध्या प्रभावी ठरत असल्याचे महिला दिना निमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या