फिटनेस महर्षी : मधुकर दरेकर

176

सामना प्रतिनिधी । मुंबई

आज त्यांचे वय ७८ वर्षे आहे ,पण विशीतल्या तरुणालाही लाजवेल  असा उत्साह आणि पोलादी शरीरयष्टी त्यांच्याकडे आहे. या साऱ्याचे गुपित त्यांनी ६० वर्षे केलेल्या व्यायाम आणि फिटनेससंवर्धन साधनेत  दडलेले आहे. रोज पहाटे ५ वाजता उठायचे आणि चे व्यायाम शाळेत  व्यायामाचे मार्गदर्शन करायचे हा त्यांचा शिरस्ता आजही अव्याहतपणे सुरु आहे. परळच्या सोशिअल सर्विस लीग सुरु केलेली फिटनेस मार्गदर्शनाची परंपरा दरेकर सरांनी वयाच्या अट्ठ्याहत्तरीतही नित्यनेमाने सुरु ठेवली आहे. महाराष्ट्राला अनेक  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर  देणारे दरेकर सर सोमवारी २५ जूनला ७८व्या  वर्षात पदार्पण करीत आहेत. सुमारे ५४ वर्षे पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या या फिटनेस महर्षींच्या कार्याला कुर्निसात करावा तितका थोडाच आहे.

वरळीच्या ग्लॅक्सो लॅबमध्ये  ३४ वर्षे काम करणाऱ्या मधुकर दरेकर सरांनी आतापर्यंत सोशिअल सर्विस लीग ,परळचे कामगार क्रीडा भवन, चेम्बुरची पवनपुत्र व्यायामशाळा ,वांद्रे येथील बांद्रा फिसिकल कल्चरल असोसिएशन,गोरेगावचे करमरकर हेल्थ स्पा, चैतन्य हेल्थ केअर आणि दरेकर फिटनेस क्लबमधून दरेकर होतकरू पॉवरलिफ्टर आणि व्यायामपटू घडवण्याचे मोठे कार्य ते निस्वार्थपणे करीत आहेत .त्यांचे अनेक शिष्य आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करीत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धांत पदके मिळवणारे दरेकर युवकांना फिटनेस आणि शरीरसौष्ठवाचे धडे देत आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यावरही फिटनेस मार्गदर्शनाचा त्यांचा दिनक्रम अव्याहतपणे सुरु आहे. या क्षेत्रात पैसे कमावण्यापेक्षा क्रीडापटू घडविण्याच्या ध्येयामुळे महाराष्ट्राचे पॉवरलिफ्टिंग महर्षी म्हणून दरेकर यांचे नाव आदराने घेतले जाते.

प्रशिक्षण कार्याचा मोठा गौरव
मधुकर दरेकर यांच्या कार्याचा मोठा गौरव  महाराष्ट्र सरकारने त्यांना श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार,दादोजी कोंडदेव क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन केलेला आहे याशिवाय गुणवंत कामगार, मुंबई महापौर पुरस्कार, श्रमगौरव ,कामगार रत्न, महराष्ट्र रत्न, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, समाजभूषण असे बहुमानाचे पुरस्कार प्रदान करून मधुकर दरेकर सरांच्या बहुमूल्य कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या