#Article370 सरकारचा लोकशाही विरोधातील निर्णय, काँग्रेसचा विरोध सुरुच

376
priyanka-gandhi

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे 370 कलम हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवेधानिक आहे. मोदी सरकारने लोकशाही प्रक्रियेचे पालन केले नाही, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी केली आहे. सोनभद्रमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. यावरून 370 कलम रद्दबातल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला अद्यापही काँग्रेसचा विरोध सुरू असल्याचे दिसते.

सोनभद्रमध्ये काही दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची प्रियंका गांधी वढेरा यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रियंका यांनी सरकारच्या 370 कलम हटवण्याच्या निर्णयावर टीका केली. सरकारने 370 कलम हटवताना लोकशाही मुल्यांचे पालन केले नाही. सरकारचा हा निर्णय संपूर्णपणे असंवेधानिक आहे. असा कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक असते, परंतु सरकारने याचे पालन केले नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसचा विरोध सुरूच
370 कलम हटवल्यापासून काँग्रेसचा याचा विरोध सुरू आहे. गुलाम नबी आझाद यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले होते. तर सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशापुढे गंभीर संकट असल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या