जम्मू-काश्मीरच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करा; ‘या’ बड्या नेत्यांनी केली मागणी

1638

जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेले तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं, एच. डी. देवेगौडा, सीताराम येचुरी, डी. राजा आणि यशवंत सिन्हा यांनी संयुक्त पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

‘राज्यघटना ही नेहमीच आपल्या विविधतेतील एकतेच्या संकल्पनेच्या बाजूने उभी राहिली आहे. मात्र देशात आज विरोधकांच्या आवाजाची गळचेपी केली जात आहे, असा आरोप पत्राद्वारे विरोधकांनी केला आहे. टीका करणाऱ्यांचा आवाज सुनियोजित पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे या पत्रात शरद पवार म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि तिथे शांतता आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. काश्मीरमध्ये शांतता आहे तर मग माजी मुख्यमंत्र्यांना आणि इतर राजकीय नेत्यांना सरकारने नजरकैदेत का ठेवलंय? असा प्रश्न पत्रकाद्वारे या नेत्यांनी केला आहे. केंद्र सरकराने तात्काळ त्यांना मुक्त करावे, अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या