गुगल शिकवणार AI

24

आर्टिफिशल इंटेलीजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान हे सध्या जगभरातच मोठ्या प्रमाणावरती वापरले जात आहे. शिक्षण क्षेत्रापासून ते बँका, शेअर मार्केट, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, फायनान्स, ट्रान्स्पोर्ट अशी असंख्य क्षेत्रे या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अभूतपूर्व अशा विकासाकडे झेपावत आहेत. जगभरातच या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आणि या तंत्रज्ञानाला अधिक सोपे बनवण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच हिंदुस्थानातही अनेक छोटे मोठे स्टार्ट-अप या क्षेत्रात प्रवेश करत आहेत अथवा या तंत्रज्ञानावरती काम करत आहेत.

या नव्या स्टार्टअप्सना या आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, तसेच या क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून देणे यासाठी आता गुगलने पुढाकार घेतला आहे. गुगलने नीती आयोगाशी हातमिळवणी केली असून, आता या हिंदुस्थानी स्टार्टअप्ससाठी गुगल एक ट्रेनिंग प्रोग्रामची सुरुवात करत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाने सध्या संपूर्ण देशातील उद्योग क्षेत्राचेच वातावरण बदलत आहे, त्याला आधुनिकतेची साथ मिळते आहे. अशा वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच मशीन लार्ंनगसारखे तंत्रज्ञानदेखील गुगल या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून शिकवणार आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाबरोबरच ते वापरासाठी प्रोत्साहन देणे आणि या ट्रेनिंगमध्ये रिसर्च आणि स्कॉलरशिपदेखील उपलब्ध करून देणे असा कार्यक्रम गुगलने आखला आहे. रिसर्च इकोसिस्टमला चालना देण्याबरोबरच हिंदुस्थानातील रिसर्चर्स, स्कॉलर्स आणि युनिव्हर्सिटीजना आर्थिक मदतदेखील केली जाणार आहे. विद्यार्थी, ग्रॅज्युएट्स आणि इंजिनीयर्स यांच्यासाठी ऑनलाइन ट्रेनिंगदेखील उपलब्ध केली जाणार आहे.

गुगल आणि नीती आयोग एकमेकांच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लार्ंनग विषयावरती हॅकेथॉनदेखील आयोजित करणार आहेत. ही हॅकेथॉन कृषी, वित्त सेवा, हेल्थ केअर, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबिलिटी सेक्टरवरती आयोजित केली जाईल, यामुळे या क्षेत्रातील अनेक अडचणींवरती उपाय शोधणेदेखील सोपे होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या