सत्याचा शोध -विवेकाचे आम्हा वावडे

चंद्रसेन टिळेकर << [email protected]  >>

ज्ञानदानाच्या क्षेत्रातही अशा धार्मिक, भाविक, अंधश्रद्धाळू माणसांच घुसखोरी वाढत गेल तर समाज कोणत्या दिशेने जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जेव्हा उमगेल तोच आपला सुदिन.

वर्षा ऋतू संपून थंडीचा मोसम सुरू झाला की, महाराष्ट्रातील व्याख्यानमालाही उत्साहाने कामाला लागतात. काही वर्षांपूर्वी जळगाव परिसरातील एका नामवंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला तुमचे व्याख्यान ठेवायचेय, पण विषय विनोदी हवा.” मी म्हणालो, ‘‘अंधश्रद्धेच्या गमती जमती’ हा विषय ठेवा, विनोदी आहे.’’ काही काळ समोरून काहीच उत्तर येईना. मात्र ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असावेत असे जाणवले. कारण त्या दुसऱ्या व्यक्तीने मला विनवले की, हा विषय नको. दुसरा सुचवा. मी म्हणालो, ‘‘आपण ‘हाइड पार्क ते अत्रे कट्टा’ असा विषय घेऊ या का? खूप माहितीपूर्ण विषय आहे.” त्यांनी तत्परतेने होकार दिला.

सपत्नीक व्याख्यानाच्या दिवश मी सकाळीच पोहोचलो. दुपारी जैन पद्धतीचे छान गोड जेवण झाले. एक झोपही घेतली. दुपारचे चार वाजून गेले होते आणि व्याख्यान रात्र नऊ वाजता होते. काही नवीन मुद्दे मांडता येतील का? या विचाराने मी डायरी काढली आणि काही लिहिणार तोच त्या व्याख्यानमालेचे तीन-चार पदाधिकारी भेटायला आले आणि म्हणाले, ‘‘टिळेकर साहेब, तुमच्या आजच्या व्याख्यानाचा थोडा प्रॉब्लेम झालाय.’’

‘‘काय हो?’’ मी न समजून विचारले.

‘‘सर, आज तुमच्या व्याख्यानाला फारसे लोक  येणार नाहीत.”

‘‘का बरं, विषय त्यांच्या आवडीचा नाही का?’’

‘‘त्याचं असं झालं सर, आतापर्यंत तीन व्याख्याने झाली. दुर्दैवाने एकूण एक रटाळ होते. एक कॉलेजचे प्राध्यापक एखादा प्रबंध वाचल्यासारखे बोलले. तास-दीड तास! त्यात एखादा हलकासा विनोदही नव्हता. तेव्हा श्रोते म्हणाले, या कडक थंडीत उघडय़ावर आम्ही कुडकुडत दोन तास बसणार. तेव्हा प्रबोधनासोबत थोडं रंजनही व्हावं. तेव्हा आम्ही उद्या व्याख्यानाला येऊ याच गॅरेंटी नाही आणि आज नेमकं तुमचं व्याख्यान आहे.” ‘‘अरे बाप रे, मग व्याख्यान रद्द करू या का? श्रोतेच नसतल तर बोलायचे कुणापुढे?’’ मी हवालदिल होत विचारले. त्यांच्यापैकी एक जण मला दिलासा देत म्हणाले, “छे छे, तसं करायची काहीएक गरज नाही. लोकांनी यावं म्हणून आम्ही पुरेपूर बंदोबस्त केलाय.”

‘‘नेमकं काय केलंय?’’ म आवंढा गिळत विचारलं.

‘‘आम्ही आज सकाळपासून दोन जीप गावात सोडल्यात आणि त्यावरच्या लाऊड स्पकरवरून दणक्यात प्रचार चालवलाय?’’

‘‘कोणता?’’ मी विचारलं.

‘‘अहो, ही काय एक जीप तुमच्या विश्रामगृहाच्या बाहेरच उभी आहे. कुणीतरी साहेबांना प्रचार ऐकवा.” खूण केल्याबरोबर लाऊड स्पीकरमधून मोठय़ा आवाजात ऐकू येऊ लागले, ‘‘मुंबईचे तुफान विनोदी वक्ते चंद्रसेन टिळेकर यांचे तुफान विनोदी भाषण, याल तर हसाल, न याल तर फसाल!” ते ऐकल्याबरोबर माझ्या पोटात मोठा गोळा आला. मी अक्षरशः कळवळून त्यांना म्हणालो,

‘‘अहो, तुम्ही हे काय केलंत? हा विषय मुळीच विनोदी नाही.”

मग एक जण म्हणाला, ‘‘सर, आजचं व्याख्यानही जर कंटाळवाणं झालं, तर उरलेल चारही व्याख्यानं आम्हाला गुंडाळावी लागतील.”

मी एक मोठा उसासा सोडत म्हणालो, ‘‘तुम्ही आता निघा. व्याख्यानाला अजून चार तास बाकी आहेत. बघतो काय करता येईल ते.”

सुटका झाल्यासारख ती माणसे निघून गेली. मी मात्र शोकाकूल अवस्थेत डोकं गच्च धरून बसलो, पण आता फार वेळ घालवणे शक्य नव्हते. दीड तासाच्या भाषणात पाऊण तास हाइड पार्क व पाऊण तास अत्रे कट्टय़ावर बोलायचे होते. मी सुरुवातलाच आपण किती विनोदी बोलतो, या भ्रमात असताना श्रोत्यांन मुळीच हसायचे नाही असे ठरवून त्या वक्त्याच कशी जिरवली हा किस्सा सांगायचे ठरवले. रात्र व्याख्यानाच्या जागी गेलो तर मैदान तुडुंब भरलेले होते. एवढी मोठी गर्दी पाहून वक्त्याला आनंद व्हायला पाहिजे, पण मला त्या थंडीतही घाम फुटला. कारण श्रोते विनोदी भाषण ऐकायला आले होते. मी श्रोत्यांना पहिले पाऊण तास मला सहन करा. मग नंतरच्या पाऊण तासात आपण नक्की विनोदाच्या डोहात डुंबू असे आश्वासन दिले.

जेव्हा अत्रे कट्टय़ासंबंध बोलताना शहरी लोकांन ऐकून ऐकून गुळगुळीत झालेले, पण ग्रामीण भागात न पोहोचलेले अत्र्यांचे विनोद सांगितले आणि श्रोत्यांनही मनमुराद आनंद लुटला. खुश होऊन पदाधिकारी आम्हा पती-पत्नीला मोठय़ा हॉटेलात घेऊन गेले. राहून राहून ते मला ‘‘तुम्ही आम्हाला मोठय़ा संकटातून वाचवले’’ असे म्हणत होते. शेवटी मी त्यांना प्रश्न केला की, ‘‘तुम्हाला विनोदी भाषण हवे होते तेव्हा मी तुम्हाला अंधश्रद्धा हा विषय सुचवला, तेव्हा तो का निवडला नाही?’’ थोडेसे चुळबुळत म्हणाले, ‘‘टिळेकर साहेब, आम्ही सर्व पदाधिकारी धार्मिक क्षेत्रात व्यवसाय करतो. सत्यनारायणाच्या पूजेपासून सर्व प्रकारच्या पूजा सांगतो. माझ्या बाजूला बसलेले उत्तम ज्योतिष म्हणून प्रख्यात आहेत. त्यांना पत्रिका दाखवल्याशिवाय कुण लग्नालाच उभा राहत नाही. ते पलिकडचे उत्तम वास्तुशास्त्रज्ञ आहेत. त्यांना विचारल्याशिवाय या पंचक्रोशत कोणी घर घेत नाही किंवा घराची मोडतोड करीत नाही. अशा पार्श्वभूमीवर आम्हाला वाटलं, तुम्हाला अंधश्रद्धा विषय दिला तर तुम्ही या विषयांच्या विरोधात बोलणार. म्हणजे आमच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.”

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. व्याख्यानावरून परतताना माझ्या डोक्यात एकच काहूर माजले होते की, ज्ञानदानाच्या क्षेत्रातही अश धार्मिक, भाविक, अंधश्रद्धाळू माणसांची घुसखोरी वाढत गेली तर समाज कोणत्या दिशेने जाणार आहे?

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीश निगडीत आहेत)