साय-फाय – फेसबुकचे पाय खोलात

>> प्रसाद ताम्हणकर

कधीकाळी आपल्या उपयुक्ततेमुळे चर्चेत असणारा जगातल सर्वात मोठा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म काही काळापासून फक्त विविध वाद आणि आरोप यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत इंटरनेट सुरक्षा आणि डेटा गोपनयता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरण युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनने दंड ठोठावल्याने चर्चेत असलेले फेसबुक आता अमेरिकेच्या माज राष्ट्राध्यक्षांवरील उठवलेल्या बंदीमुळे आणि दहा हजार लोकांना नोकरीवरून कम करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे प्रचंड चर्चेत आलेले आहे. फेसबुकने घेतलेल्या अनेक निर्णयांचे पडसाद हे जगभरात उमटत असल्याने त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

2020 साल ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून पराभव झाला. मात्र हा निकाल अमान्य करत तो बदलण्यासाठी ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांन संसदेला घेराव घातला आणि उग्र निदर्शने केल. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात पाच जणांच्या मृत्यू झाला. यानंतर फेसबुकने तातडीने कारवाई करत ट्रम्प यांच्यावर हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये केल्याचा ठपका ठेवत बंदी घातल. त्यांचे विचार यापुढे लोकांसाठी सुरक्षित असतल, द्वेष पसरवणारे नसतल अश खात्र पटल्यावरच त्यांना यानंतर फेसबुकवर परतण्याच अनुमत देण्यात येईल, असे फेसबुकने जाहीर केले होते. आता ही बंदी उठवल्याने जगभरातून फेसबुकच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.

हा वाद शमत नाही तोवर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्ट्राग्राम यांच मालकी असलेल्या मेटा कंपनीने दहा हजार लोकांना कामावरून काढत असल्याच घोषणा केली आणि पुन्हा एकदा चर्चांन जोर पकडला आहे. अनेक टेक कंपन्या कामगार कपात करत असताना फेसबुकच कामगार कपात प्रचंड चर्चेत आहे. कारण यापूर्वी 2022 सालदेखील फेसबुकने 11000 लोकांना कामावरून कमी केले होते. यावेळी कामगार कपातीसोबतच 5000 पदे रिक्त ठेवण्याचा निर्णयदेखील कंपनीने घेतल्याने उद्योग क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कामगारांना पाठवलेल्या आपल्या संदेशात मार्क झुकरबर्गने या परिस्थितीबद्दल अमेरिकेतील वाढते व्याजदर, जगभरात असलेली अस्थिरता आणि देशविदेशातील बदलत चालले कायदे आणि नियम यांना दोष दिला आहे. 2022 साल कंपनीच्या कमाईमध्ये प्रचंड घट झाल्याचा फटकादेखल बसल्याचे त्याने आपल्या संदेशात कबूल केले आहे. आपल्याला नव्या आर्थिक परिस्थितला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे लागणार आहे. कारण हा कालावधी खूप मोठा असणार आहे असे त्याने पुढे म्हटले आहे. फेसबुकचा हा निर्णय सध्या जगभरातल उद्योगविश्वात काय वादळ घोंघावत आहे त्याच चुणूक दाखवणार आहे.

विशेष म्हणजे फेसबुक आता कंपनीच पुनर्रचना करणार असून ही पुनर्रचना होईपर्यंत कोणतेही नवे पद भरले जाणार नाही. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फेसबुकमध्ये नव नोकरभरत होणार नाही. यावेळी बोलताना झुकरबर्ग असेदेखल म्हणाला की, ऑफिसमध्ये येऊन काम करणाऱया इंजिनअर्सच कामगिरी ही घरी बसून काम करणाऱया इंजिनअर्सपेक्षा अधिक चांगल होत. त्याच्या या विधानामुळे आता कंपनच काम करण्याच पद्धतदेखील बदलल जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. फेसबुकसारख्या कंपनने असा काही निर्णय घेतल्यास इतर मोठय़ा कंपन्यादेखल त्याचे अनुकरण करणार का आणि अशा निर्णयामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱया लोकांवर काय परिणाम होणार हा मोठा प्रश्न आहे.

जगभरातल कंपन्यांचा अभ्यास करणाऱया एका संस्थेच्या दाव्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांत जगभरातील टेक कंपन्यांनी 1,28,000 लोकांच्या नोकऱया काढून घेतल्या आहेत. ज्या परिस्थितमधून फेसबुक जात आहे, त्याच परिस्थितीचा सामना गुगल, अॅमेझॉनसारख्या मातब्बर कंपन्यादेखील करत आहेत. गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेटने 12000 लोकांना कामावरून कमी केले तर वर्षाच्या सुरुवातीलाच अॅमेझॉन कंपनीने 18000 लोकांना कामावरून कमी केले. यावेळी ऍमेझॉननेदेखल या परिस्थितीला कोरोना आणि जगभरातील अनिश्चित अर्थव्यवस्था जबाबदार असल्याचे कारण दिले होते. नव्या युगाची नवी आव्हाने पेलण्यासाठी या दिग्गज कंपन्या आणि त्यांच्याश संबंधित सर्व लोक काय नवे करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

[email protected]