देवांची भाषा

242

प्रतिनिधी

संस्कृत म्हणजेच गीर्वाणभारती…देवांची भाषा,सूरभारती अशी विविध विशेषणे असलेली संस्कृत भाषा. आज ही भाषा लोप पावत आहे. प्राचीन साहित्याचा महान ठेवा असलेली ही भाषा एकेकाळी हिंदुस्थानची व्यावहारिक भाषा होती, मात्र आता संस्कृत भाषेतील जाणकार तसे कमीच आढळतात. त्यामुळे या भाषेमध्येही करीअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

ज्यांना लहान वयापासूनच या विषयाची आवड आहे, असे विद्यार्थी यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. संस्कृत भाषेची रचना ध्वनिशास्त्रावर आधारित आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या ध्वनींच्या उच्चारणाची सवय या भाषेमुळे होते. आधुनिक काळात संस्कृत श्लोक आणि महाकाव्यांमधील काही उताऱ्यांचा वापर चित्रपटांमध्ये होताना दिसतो. टी-शर्टवरही संस्कृत सुभाषिते आणि श्लोक प्रिंट करून घेतले जातात. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘एसएमएस’मधून संस्कृत सुभाषिते पाठवण्याचा उपक्रम संस्कृतप्रेमी करत आहेत.

संस्था

– देशभरामध्ये संस्कृतचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’ची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत संस्कृतच्या विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

– बोली भाषेमध्ये संस्कृतचा वापर व्हावा यासाठी ‘संस्कृत भारती’ ही संस्था विनामूल्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करते.

– शेठ गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, मुंबई

– बीए संस्कृत महाविद्यालय, मुंबई

– एम. ए. संस्कृत महाविद्यालय, मुंबई

– के. जे. सोमैया संस्कृत विद्यापीठ, मुंबई

संधी

संस्कृतमध्ये पदवी घेऊन बी. एड. केल्यानंतर शिक्षक म्हणून आणि उच्च शिक्षण घेतल्यास प्राध्यापक म्हणूनही काम करता येते.

प्राचीन साहित्य संस्कृतमध्ये उपलब्ध असल्याने त्याच्या भाषांतरासाठी इतिहास संशोधन केंद्र, प्राचीन ग्रंथ भांडारे, जुन्या

लिप्या, शिलालेख येथे भाषांतरकाराची आवश्यकता असते.

संस्कृतच्या बळावर सैन्यदलातही नोकरी मिळू शकते. ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’तर्फे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी सैन्यदलात पंडित नेमले जातात. यासंबंधीची जाहिरात दरवर्षी प्रसिद्ध होते.

 

आवश्यक गुण

– मनावर चांगले संस्कार होण्यासाठी तरी संस्कृत शिकणे गरजेचे आहे. संस्कृतच्या अभ्यासामुळेच त्याची गोडी निर्माण होईल.

– संशोधनाची आवड असावी. कारण पुरातन शिलालेख वाचण्यासाठीही संस्कृत भाषेतील जाणकारांची आवश्यकता असते.

– संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वभाषाभिमान असावा. या गुणामुळेच ही भाषा तो आवडीने शिकू शकतो.

– व्याकरणाची आवड.

आपली प्रतिक्रिया द्या