सोशिक स्त्रीच्या वेदनांची सरिता

>> अब्दुल हकीम

ज्योती सोनावणे यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह, पण तरीही त्यांची काव्यप्रतिभा उंचावर घेऊन जाणारा हा संग्रह आहे. बहुतांशी कविता स्त्राrभोवती फिरणाऱया व त्यांची बाजू ठळकपणे मांडणाऱया आहेत. कवयित्रीचे समाजभान, स्त्र्ायांविषयीची तळमळ संग्रहाचा आत्मा आहे.

स्त्राी खरे तर या समाजाचा खराखुरा आधारस्तंभ आहे. तिच्यामुळे घराला घरपण आहे, पण तिला आज संघर्ष करीत जन्माला यावे लागते अन् संघर्षाच्या मालिकेत भूमिका करत जगावे लागते. कवयित्री याच वस्तुस्थितीला वाचकांच्या पुढे काव्यात्मक शैलीने मांडते आहे. यालाच कवयित्री

स्त्राी जन्म लाभणे म्हणजे

दुःख सोसणं असतं

आतून दुःखी असतानाही

वरतून हसत राहणं असतं

स्त्राrव्यथेची सुरुवातच आज भ्रूणहत्या रूपाने अंधारात होते. म्हणूनच तर कवयित्री स्त्राrभ्रूणहत्येचे मार्मिक वर्णन ‘गर्भकन्या’ कवितेची सुरुवात करताना लिहिते… गर्भात खुडल्या जात असलेल्या शेकडो कळय़ांपैकी एकीला प्रतिनिधी बनवून बोलतं करते आहे.

आई तू दवाखान्यात जाणार उद्या

मोजत आहे मी माझे निसटते क्षण

पोटच्या मुलीला आयुष्यातून काढताना

हेलावत नाही का गं तुझं मन

आपल्या मुलीवरची माया माझी मुलगी या कवितेतून मांडली आहे.

चेहऱयांवर सुरकुत्यांची जाळी

हातापायाच्या झाल्या काडय़ा

तरी माय वेचत असते

भर उन्हात पळहाटय़ा

ग्रामीण भागातील माय उभी करत साहेब बनल्यावर पोरा आईची लाज वाटू देऊ नको तर तिचा सांभाळ कर म्हणत आहे. नाहीतरी आज जन्मदात्री आई वृद्धाश्रमात ठेवणाऱया साहेबांची कुठं कमतरता आहे?

तुझ्या घराच्या एका कोपऱयात

राहू देत तू मला बाळा

तुझ्या जन्मापासून लागला रे

मला तुझ्या सहवासाचा लळा

वृद्धाश्रमाचे नाव काढता

मन माझे गहिवरून येते

नवसाचा रे तू माझा छकुला

आई कशी रे तुला जड होते

वरील ओळी भावनेला हात घालणाऱया आहेत आणि ही भावना काव्यातून वाचकांपर्यंत पोहचते. आज स्त्राr-पुरुष समानतेच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात. तिला मिळालेल्या आरक्षणाची चर्चा चघळली जाते, पण तरीही तिला मिळालेल्या आरक्षणावरदेखील पुरुष मंडळी कसे ताबा करतात यावर लिहिताना त्यांनी सरळ ग्रामीण भागातील महिला सरपंचाच्या हक्कांकडे इशारा केला आहे तो असा,

काय फायदा पन्नास टक्के आरक्षणाचा

नाव तुझे अन् काम त्याचे

सरपंच म्हणुनी तू निवडून येती

स्वातंत्र्य आहे का मनाने सही करण्याचे

स्त्र्ायांची स्थिती मांडताना कवयित्री महापुरुषांना पण आदराने काव्यात स्थान देत त्यांनी महिला क्रांतीत दिलेले योगदान अधोरेखित केले आहे. तर सावित्रीबाई फुले यांना ‘सावित्री फक्त तुझ्यामुळे’ या कवितेतून अशी मानवंदना दिली,

तू तिला उठवण्यासाठी हात दिलास

बुरसटलेल्या परंपरा मोडण्याचा आदर्श दिलास

स्वावलंबी बनवण्याचा ध्यास लावलास

स्वकर्तृत्वावर कुटुंब चालवते आहे ती आज हे सर्व फक्त सावित्री तुझ्यामुळे

याव्यतिरिक्त महागाई, व्यसन, नेक काम कर, पाऊस गावाकडचा, गरिबी इत्यादी कवितादेखील कविता संग्रहाची विविधता दर्शवणाऱया तसेच कवयित्रीच्या काव्यप्रतिभेची चुणूक दाखवणाऱया आहेत. गोदा प्रकाशन संभाजीनगर यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहात एकूण 71 कवितांचा समावेश आहे. सरदार यांनी काढलेले मुखपृष्ठ तर रसिका देशमुख यांची प्रस्तावना पुरेशी बोलकी आणि संग्रहाला न्याय देणारी आहे. या पहिल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल मी ज्योती यांचे हार्दिक अभिनंदन करतो अन् पुढील साहित्य प्रवासाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.

सामर्थ्य आहे तुझ्यातही

कवयित्री- ज्योती सोनवणे-पवार

प्रकाशन – गोदा प्रकाशन संभाजीनगर

मूल्य – 150 रुपये

 

आपली प्रतिक्रिया द्या