कसब स्वयंपाकाचे!

>> मृदा झरेकर,  म. ल. डहाणूकर कॉलेज

योगयोगेश्वर जय शंकरया मालिकेतून अभिनेता संग्राम समेळ दररोज आपल्या भेटीला येतो. संग्राम समेळ याच्या खाण्याच्या आवडीनिवडी आणि फिटनेसबद्दल जाणून घेऊया.

संग्राम कोणताही डाएट फॉलो करत नाही, पण आहाराचे काही नियम आवर्जून पाळतो. दोन-दोन तासांच्या अवधीमध्ये, पण कमी प्रमाणात खायचे. सायंकाळी सात-साडेसातला  दिवसाचे शेवटचे जेवण म्हणजेच रात्रीचे जेवण करायचे हा त्याचा फंडा.

संग्राम म्हणतो, शरीर लवचिक हवे. त्यामुळे कोणतेही पात्र साकारण्यासाठी हवा तसा बदल करता येतो. सध्या तो ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत काम करत आहे. या व्यक्तिरेखेसाठी बारीक दिसणे गरजेचे आहे. फिट राहण्याचा करीअरमध्ये फायदा होतो, हे सांगायला तो विसरत नाही.

  जर एखाद्या दिवशी गोड जरा जास्तच खाल्ले, तर त्याला व्यवस्थित संतुलित करायला पुढील तीन-चार दिवस गोड खाऊ नका. झाले की बॅलन्स… संग्राम हसून सांगतो.

 संग्राम अनेक वर्षांपासून स्वतः स्वयंपाक करतो. फुडी असल्यामुळे फक्त जेवण्याचेच नाही, तर ते बनवण्याचे कसबही त्याच्याकडे आहे. स्वयंपाक त्याच्यासाठी मेडिटेशन आहे. चार लोकांना खाऊ घालायला त्याला मनापासून आवडते. अगदी पुरणपोळीपासून फराळाचे सर्व पदार्थ उत्तम रीतीने बनवता येतात. व्हेज असो की नॉनव्हेज पदार्थ. सध्या तो शूटिंगनिमित्त सहकारी कलाकारांसोबत राहतोय. तिथेदेखील तो उत्तम जेवण करून सर्वांना खाऊ घालतो. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी डिश देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. संग्रामला आईच्या हातची मटण बिर्याणी आणि पत्नीच्या हातचा तांबडा-पांढरा रस्सा आवडतो. कलाकंद ही त्याची अत्यंत प्रिय मिङ्गाई आहे.

 डाएट असा ङ्खेवा की जो तुम्ही आयुष्यभर सांभाळू शकता. जो तुम्हाला सोईस्कर आहे. स्वतःची एक शिस्त निर्माण करा. मग तुम्ही ते आयुष्यभर फॉलो करू शकता. मन मारून जगायला अर्थ नाही. जे आवडेल ते खा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका किंवा अगदीच कमीही नका करू. योग्य संतुलन सांभाळता आले पाहिजे, असे संग्राम सांगतो.

‘ललित 205’ या मालिकेच्या वेळी संग्राम अख्ख्या युनिटसाङ्गी स्वयंपाक करायचा. मटण खिमा किंवा चिकण असे पदार्थही त्याने बनवले होते. मित्रांसोबत कुठे बाहेर जाण्याआधी त्या ठिकाणची फूड स्पेशॅलिटी जाणून घेण्याकडे त्याचा कल असतो.