अरुण गवळी यांचा उच्च न्यायालयात फर्लोसाठी अर्ज

30

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे फर्लोसाठी (संचित रजा) अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी मंगळवारी न्या. पी. एन. देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षक यांना नोटीस बजावून दोन आठवडयात उत्तर मागितले आहे.

कुटुंबियांना भेटण्याकरिता अरुण गवळी यांनी संचित रजा देण्याची मागणी केली आहे. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गवळी यांना कारागृह प्रशासनाने संचित रजा नाकारली आहे. कारागृह महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्त यांच्या या निर्णयाविरोधात अरुण गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली आहे. याआधी पत्नी आशा गवळी आणि त्यांच्या आईच्या आजारपणासाठी तसेच मुलाच्या लग्नासाठी हायकोर्टाने रजा मंजूर केल्या आहेत.

…………

कमलाकर जामसंडेकर खूनप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने ३ ऑगस्ट २०१२ रोजी अरुण गवळीसह ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी अरुण गवळी यांची रवानगी नागपूर कारागृह येथे केली.

आपली प्रतिक्रिया द्या