अचानक जग सोडून गेले ‘हे’ 10 लोकप्रिय नेते

2856

जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. परंतु काहींच्या अकाली जाण्यामुळे मनाला चुटपूट लागून राहते. मनोहर पर्रीकर, शीला दीक्षित, सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटली यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय क्षीतिजावर एक पोकळी निर्माण झाली. गेल्या वर्षभरात हिंदुस्थानने देखील 10 लोकप्रिय नेते गमावले आहेत.

अरुण जेटली

arun
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवार 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेटली हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते मानले जात.

सुषमा स्वराज

sushma-swaraj1
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट, 2019 रोजी निधन झाले. 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2014 ते 2019 दरम्यान परराष्ट्रमंत्रीपदावर असताना स्वराज यांनी आपल्या कार्यकुशलतेने देशवासियांचे मन जिंकले होते. जगभरातील देशांसोबत हिंदुस्थानचे मजबूत संबंध प्रस्थापित करण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण राहिले

शीला दीक्षित

sheila-dixit-new-21-july
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचे 20 जुलै, 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1998 ते 2013 दरम्यान त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दिल्लीतील सुधारणांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.

मनोहर पर्रीकर

_manohar_parrikar
माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांचे 17 मार्च, 2019 रोजी निधन झाले. लोकांच्या मनावर राज्य करणारा हा नेता अचानक गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. पर्रीकर संरक्षणमंत्री असताना हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून पहिला एअर स्ट्राईक केला होता.

अनंत कुमार

ananth-kumar
भाजपचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंद कुमार यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. 12 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी अखेरचा श्वार घेतला. दक्षिण बंगळुरूमधून सलग सहावेळा विजय मिळवलेल्या कुमार यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होता.

अटल बिहारी वाजपेयी

atalaji-new
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट, 2018 रोजी निधन झाले. तीन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधान बनण्याचा मान पटकावणाऱ्या वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सत्तेत असताना आणि विरोधात असतानाही आदर मिळणारे वाजपेयी देशवासियांच्या सदैव स्मरणात राहतील.

मदनलाल खुराना

madanlal-khurana
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. 27 ऑक्टोबर, 2018 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1993 ते 1996 दरम्यान ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. वायपेयी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन मंत्रालयही सांभाळले होते.

बाबू लाल गौर

babu-lal-gaur
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बाबू लाग गौर यांचे 21 ऑगस्ट, 2019 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षाचे होते. 2004 ते 2005 दरम्यान ते मुख्यमंत्री होते. गोविंदपुरा विधानसभा मतदारसंघातून 10 वेळा ते निवडून गेले होते.

जगन्नाथ मिश्रा

jagannath-mishra
बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे 19 ऑगस्ट, 2019 रोजी निधन झाले. बिहारचे तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी पटकावला होता. 1975 ला पहिल्यांदा, 1980 ला दुसऱ्यांदा आणि 1989 ते 1990 दरम्यान ते तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले होते.

करुणानिधि

karunanidhi
दाक्षिणात्य राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे डीएमचे प्रमुख करुणानिधि यांचे 7 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. तमिळनाडूचे 5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले करुणानिधि हे 12 वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या