राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे पगार वाढले

993

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे पगार वाढवले आहेत. या अर्थसंकल्पानुसार राष्ट्रपतींचा पगार ५ लाख, उपराष्ट्रपतींचा पगार ४ लाख आणि राज्यपालांचा ३.५ लाख रुपये करण्यात आला आहे. तसेच यात खासदारांचे पगारही महागाईचा आढावा घेऊन बदलणार आहेत. जेटली यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर संसदेतील सर्व खासदारांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला.

सध्या राष्ट्रपतींना दर महिना १.५ लाख रूपये, उपराष्ट्रपतींना १.२५ लाख रूपये तर राज्यापालांना एक लाख रूपये पगार मिळतो. या सर्वांचे पगार वाढविण्याचा प्रस्ताव २०१७ मध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला या अर्थसंकल्पातून अरुण जेटली यांनी मंजूरी दिली आहे.

महागाईनुसार वाढणार खासदारांचे पगार
जेटली यांनी खासदारांचे पगार थेट वाढवले नसले तरी दरवर्षी महागाईचा आढावा घेऊन खासदारांचे पगार वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यासाठी केंद्र सरकार नवा कायदा तयार करणार आहे. खासदारांच्या वेतनाचा आढावा घेणारी नवी व्यवस्था १ एप्रिल २०१८ पासून लागू होणार आहे. मात्र खासदारांच्या वेतनाचा आढावा कुठल्या निकषांवर होईल, त्यात किती टक्क्यांनी वाढ होईल याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या