अरुण जेटली यांना साश्रूपूर्ण निरोप, पंचत्वात विलीन

378

दिल्लीतील निगमबोध घाटार माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटली यांचा मुलगा रोहन यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आणि मान्यरांनी शोकाकुल वातारणात त्यांना अखेरचा निरोप दिला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसिद्ध कील अरुण जेटली यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 र्षांचे होते. नवी दिल्लीतील  ‘एम्सरुग्णालयात शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामविलास पासवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपमधील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जेटलींचे पार्थिक दिल्लीतील भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले होते. दुपारी दोन वाजता जेटलींचे पार्थि दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यविधीसाठी आणण्यात आले. आणि सवातीन वाजण्याच्या सुमारास जेटलींर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या