राहुल गांधींनी माफी मागितली, त्यांची विश्वासार्हता संपली; अरुण जेटलींची टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  

राहुल गांधी हे एका मोठ्या पदावर आहेत. जेव्हा एक राजकीय व्यक्ती माफी मागते तेव्हा त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होता. राहुल गांधींनी माफी मागितली आणि त्यांची विश्वासार्हता संपली अशी टीका केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. ट्विटरवर एक व्हिडीओ टाकून त्यांनी ही टीका केली आहे.

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष असून ते महत्त्वाच्या पदावर आहेत. ते जे काही बोलतील त्यांच्या प्रत्येक शब्दाला विश्वासार्हता असते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जी काही व्यक्तव्यं केली आहेत त्यात सत्यतेचा अभाव आहे. ते एकतर्फी खोटं बोलतात आणि त्यावर काही उत्तर देण्याची गरज त्यांना वाटत नाही. यामुळे त्यांना एक माफीनामा जाहीर करावा लागला. ही बाब न्यायाधीन असून त्यावर मी काही बोलणार नाही. परंतु जेव्हा एका राजकीय नेत्याला जेव्हा माफी मागावी लागते, तेव्हा त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. राहुल गांधींनी जी व्यक्तव्यं केली त्यात विश्वासार्हतेचा अभावच होता. त्यांच्या माफीनाम्याने ही विश्वासार्हत संपुष्टात आली” असे जेटली म्हणाले.