फाळणीनंतर लाहोरहून दिल्लीत आले होते जेटली यांचे आजोबा

941

1947 मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर जेटली यांचे आजोबा कुटुंबासह दिल्लीत आले होते. फाळणीपूर्वी ते लाहोरमध्ये राहत होते. दिल्लीत आल्यानंतर जेटली यांचे कुटुंब नारायण विहारमध्य राहत होते. जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 मध्ये पंजाबी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. जेटली यांचे वडिल पेशाने वकील होते. ते दिल्लीत वकीली करत होते. वडिलांचा आदर्श समोर ठेवत जेटली यांनी कायद्याची पदवी संपादन केली. 1974 मध्ये डीयू स्टुडेंट युनियनचे ते अध्यक्ष झाले. ते अख्ल भारतीय विद्यार्थी परिषेदशी संबंधित होते. त्यानंतर 1980 मध्ये ते भाजपात सहभागी झाले.

पक्ष कार्य करण्याबरोबरच त्यांनी वकीलीतही नाव कमावले होते. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वरिष्ठ अधिक्ता पदावर काम केले होते. वकिलीच्या पेशात त्यांचे विशेष प्रभूत्व होते. जेटली यांचा मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली हेदेखील पेशाने वकील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या