हेलिकॉप्टरमध्ये चढताना अरुण जेटलींचा पाय घसरला, डोक्याला जखम

सामना ऑनलाईन । हरिद्वार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील आश्रमाला भेट देऊन दिल्लीला परत जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या डोक्याला जखम झाली आहे. जेटली यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जखम किरकोळ स्वरुपाची असल्याचे सांगितले आणि अर्थमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

अरुण जेटली बाबा रामदेव यांच्या आश्रमातील निसर्गोपचार केंद्राला भेट देण्यासाठी हरिद्वार येथे आले होते. बाबा रामदेव ययांच्यासोबत जाऊन जेटली यांनी निसर्गोपचार केंद्राचा कारभार बघितला. नंतर परतण्यासाठी म्हणून हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना पाय घसरल्याने जेटली यांना किरकोळ जखम झाली.