काँग्रेसने लहान मुलासारखे रडू नये! जेटली यांनी उडवली काँग्रेसची खिल्ली

54
rafale-arun-jaitley

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेने कोणत्याही नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत नाही हे विरोधकांना कधी कळणार, असा सवाल विचारात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध वारंवार निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या विरोधी पक्षांची जोरदार खिल्ली उडवली. आचारसंहितेच्या बाबतीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे वर्तन रडव्या आणि चिडचिडय़ा मुलासारखे आहे. त्यांनी अशा प्रकारे लहान मुलांसारखे रडू नये अशी टीका जेटली यांनी आपल्या ब्लॉगवरील लिखाणात केली आहे.

काँग्रेस वारंवार आईवडिलांकडे इतरांची तक्रार करणाऱ्या मुलाप्रमाणे ऊठसूट पंतप्रधानांच्या विरोधातील तक्रार घेऊन निवडणूक आयोगाकडे जात आहे. काँग्रेससारख्या मोठय़ा आणि जुन्या पक्षासाठी हा प्रकार शोभनीय नाही. आचारसंहितेची तक्रार करताना निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर अविश्वास दाखवणे ही बाब लोकशाहीला मारकच ठरणारी आहे. देशातील नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. मग ती आचारसंहिता असो, सर्वोच्च न्यायालय असो अथवा देशाची संसद, असेही जेटली म्हणाले.

पंतप्रधानांच्या प्रत्येक वक्तव्यात विरोधकांना ‘खोट’ का दिसते ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत प्रत्येक भाषणांवर काँग्रेससह विरोधी पक्ष ऊठसूट निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात हा प्रकार योग्य नाही असे सांगून जेटली म्हणाले, मोदी यांनी मत देताना शहीद जवानांच्या हौतात्म्याची आठवण ठेवा असे म्हटले तरी विरोधक तक्रार करतात.

आपली प्रतिक्रिया द्या