अरुण लखानी पुन्हा महाराष्ट्र बॅडमिंटनचे अध्यक्ष

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची बहुप्रतिक्षित वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक रविवारी नागपुरात पार पडली. एकतर्फी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांच्या पॅनेलने उपाध्यक्ष व माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडविला.

या निवडणुकीत लखानी पॅनेलचे एक सोडून सर्व उमेदवार निवडून आले. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत हिंदुस्थानी  बॅडमिंटन संघटनेचे कोषाध्यक्ष असलेल्या लखानी यांनी गंधे यांचा 22 मतांनी सहज पराभव केला.  उपाध्यक्षपदी अक्षय देवळकर, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी शिरीष बोरळकर निवडून आले. सहा उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत नागपूरचे मंगेश काशीकर, प्रदीप गबाडा, धनंजय गाडगीळ, ओंकार हजारे, शाह मोहन एम. आणि पंकज ठाकूर हे निवडून आले.