आणखी एका मुख्यमंत्र्यांचा नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार, पंतप्रधानांना पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे शनिवारी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही अशी चर्चा असतानाच आता आणखी एक राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त हाती आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

केजरीवाल म्हणाले की, ‘सहकारी संघराज्य (Cooperative federalism) हा विनोद आहे’ तेव्हा निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात काय अर्थ आहे?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कळवलं आहे. ‘लोक विचारत आहेत की, पंतप्रधान जर SC चे पालन करत नाहीत तर लोक न्यायासाठी कुठे जातील? NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात काय अर्थ आहे. सहकारी संघराज्य हा एक विनोद आहे’, असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

शनिवारी, 27 मे रोजी होणार्‍या निती आयोगाच्या बैठकीत आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

ही परिषद नीती आयोगाची सर्वोच्च संस्था, सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 27 मेच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे.