महाआघाडी सरकार जनतेसाठी काम करेल – अरविंद सावंत

509

सत्तेसाठी किंवा पदासाठी शिवसेना हपापलेली नसून केवळ दिलेला शब्द पाळला नसल्याने आज राज्यात नवीन सरकार सत्तेत आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दिलेला शब्द पाळला नसल्याचे राज्याला माहित आहे. राज्यात आलेले महाआघाडी सरकार जनतेसाठी काम करेल, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी रविवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

शिर्डीत आलेल्या अरविंद सावंत साईंच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच महाआघाडी सरकार जनतेसाठी काम करेल, असे ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेचे सरकार आता अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना न्याय देतील असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या