अलिबागची बाल कलाकार आर्या मोरे झळकणार ‘सावित्रीजोती’ मालिकेत

सोनी मराठी या वाहिनीवर 6 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या ‘सावित्रीजोती, आभाळाएवढी माणसं होती…’ या मालिकेत अलिबागची आर्या गणेश मोरे ही बाल कलाकार म्हणून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. सावित्रीजोती या मालिकेत ती सावित्री यांच्या जवळच्या बहिणीचे गंगाचे पात्र साकारत आहे. त्यामुळे अलिबागची ही कन्या अभिनय क्षेत्रात आपल्या नावाचा आणि जिल्ह्याचे नाव उंचवणार आहे.

आर्या मोरे ही मूळची पेण मधली असून अलिबागमधील कनकेश्वर हे तिचे आजोळ आहे. आर्या ही वडील गणेश मोरे आणि आई पूनम मोरे यांच्यासोबत चेंबूर येथे राहत आहे. चेंबूर येथील कर्नाटक हायस्कुल शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून तिला अभियानाची, डान्सची आवड आहे. ज्युनियरमध्ये असल्यापासून ती अभिनय करीत आहे.

मुंबईत झालेल्या पुलच्या आठवणींची हास्यजत्रा स्पर्धेत सातशे स्पर्धकमधून आर्या दुसरी आली होती. त्यानंतर 72 स्पर्धकांच्या झालेल्या स्पर्धेत टॉप फाईव्ह मध्ये तिची निवड झाली होती. या स्पर्धेच्या वेळी टेलिटेल मीडियाच्या वैशाली घोडपोडे, सोनीचे सिनियर प्रोड्युसर राजेश पाठक, तसेच काही दिगदर्शक, निर्माते उपस्थित होते. राजेश पाठक यांनी आर्याला अभिनय क्षेत्रात काम करणार का विचारले होते. त्यानंतर आर्या हिची सोनी टीव्हीवर सुरू होणाऱ्या सावित्री जोतीसाठी निवड झाली.

arya

सावित्री जोती मालिकेत आर्या ही गंगा नावाचे पात्र साकारत आहे. तिचा पहिलाच शॉट तिने पहिल्याच टेकमध्ये केला. याबाबत मालिकेतील सर्वांनी तिचे अभिनंदन केले. सावित्री जोती मालिकेचे शुटींग हे नायगाव रत्नदीप स्टुडिओ मध्ये सुरू असून सकाळी चार वाजता आर्या घरातून बाहेर पडते. शॉट पूर्ण झाल्यानंतरही ती अभिनय करण्यासाठी उत्सुक असते अशी माहिती आर्यांची आई पूनम मोरे यांनी दिली.

avitribai

आपली प्रतिक्रिया द्या