लोटस जेट्टी विसर्जनासाठी सज्ज

वरळीतील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जनदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता संतोष शिंदे, किनारी रस्ता प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता हृषिकेश पाटील, हर्षदा भगत, वरळी पोलीस ठाण्याचे शिंदे, ताडदेव पोलीस ठाण्याचे वेदपाठक, वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे सुहास शिंगरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी लोटस जेट्टीची पाहणी केली.  गणपती विसर्जनापूर्वी लोटस जेट्टीची डागडुजी करून इतर कामे करण्यात येतील, असे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. त्याप्रसंगी वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते.