कमल हासनच्या समर्थनार्थ ओवैसी आले धावून

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नथूराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातला पहिला दहशतवादी होता असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते आणि एमएनएम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केले होते. त्यावर देशभरात चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. हासन यांच्या वक्तव्याचे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी समर्थन केले आहे. राष्ट्रपित्याचा खून करणार्‍यास दहशतवादी नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

ओवैसी म्हणाले की, “बापूंचा खून करणारा जर दहशतवादी नाही म्हणनार तर काय म्हणनार ? त्याला महात्मा म्हणायचे की, राक्षस? त्याला दहशतवादी म्हणायचे की खुनी?”

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील सामुहिक बलात्कावर टीका करताना ओवैसी म्हणाले की, मोदींनी हापुड घटनेवर बोलायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचेच सर्कर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही त्यांची घोषणा आहे. मग पंतप्रधान या प्रकरणाची त्यांना चिंता नाही?’ तिहेरी तलाकवर मोदी खुप चिंतीत असतात असेही ओवैसी म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या