आसाराम यांना बाहेरचे जेवण देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

595

आपल्या आश्रमातील अल्पवयीन महिला भक्ताचे लैगिक शोषण केल्याच्या आरोपावरून जोधपूर तुरुंगात असलेले वादग्रस्त अध्यात्मगुरु आसाराम यांना बाहेरचे जेवण देण्याची परवानगी राजस्थान उच्च न्यायालयाने दिली आहे. आपली प्रकृती ठीक नसल्याने आपल्याला तुरुंगातील भोजनाऐवजी बाहेरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी असा अर्ज आसाराम यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करीत वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसाराम यांना बाहेरून जेवण देण्यास परवानगी दिली आहे. आसाराम यांनी पॅरोलसाठी केलेली आपली याचिका मागे घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या