विठ्ठल नामाने दुमदुमले पंढरपूर, शासकीय पूजा संपन्न

434

>> सुनील उंबरे । पंढरपूर

आज आषाढी एकादशी…विश्वदेवाच्या या महासोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून 15 लाखांहून अधिक वारकरी भाविक विठुरायाच्या पंढरीनगरीमध्ये दाखल झालेत. टाळ-मृदुंगाचा मधूर निनाद आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गगनभेदी नामघोषाने चंद्रभागातीर भक्ती रसात चिंबचिंब झालेला पाह्यला मिळतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटेची शासकीय महापूजा संपन्न झाली या पूजेत वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातील भाविक विठ्ठल आणि प्रयोग चव्हाण या दांपत्याला मिळाला. गेली वीस वर्षे हे दांपत्य वारी करते. यंदाची वारी विक्रमी भरणार असे चित्र दिसत असून चंद्रभागेचे वाळवंट, नगर प्रदक्षिणा, मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे…

आपली प्रतिक्रिया द्या