अॅशेस सीरिज : कुकनं मोडला ४५ वर्ष जुना विक्रम

23

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या अॅशेस सीरिजच्या चौथ्या कसोटी सामन्यात अॅलिस्टर कुकने ४५ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यातत २४४ धावांची खेळी करणारा कुक डाव संपेपर्यंत नाबाद राहिला. या खेळीत कुकने ४०९ चेंडूचा सामना करत २७ चौकार लगावले. याआधी हा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरच्या नावे होता. ज्यांनी १९७२मध्ये वेस्टइंडिजच्या विरोधात २२३ धावा केल्या होत्या.

कुकने या सामन्याच्या आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पाचवं द्विशतक पूर्ण केलं. जो रूटने ६१ धावांची आणि स्टुअर्ट ब्रॉडने ५६ धावांची खेळी करत कुकला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात डेविड वॉर्नरच्या १०३ धावांच्या जोरावर ३२७ धावा केल्या. कर्णधार स्टिव्हन स्मिथने ७६ आणि शॉन मार्शने ६१ धावा केल्या. इग्लंडच्या जेम्स अँडरसनने ३ आणि स्टुअर्ट ब्रॉडने ४ विकेट घेतल्या.

आपली प्रतिक्रिया द्या