Photo ना लिंबू कलर साडीचा रंग उतरला, ना 70 रुपये पुन्हा जिवंत झाले! ‘अशी ही बनवाबनवी’ला 34 वर्ष पूर्ण

तीन रुपयांच्या तिकिटावर 3 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 23 सप्टेंबर, 1988 हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रत्येकवेळी पाहताना तो ताजातवाणाच वाटतो. इतक्या वर्षानंतरही ना लिंबू कलरच्या साडीचा रंग उतरलाय, ना सत्तर रुपये पुन्हा जिवंत झाले.

ashi-hi-banwa-banwi

ऐंशी, नव्वदमध्ये जन्मलेली आणि दोन हजार सालानंतर जन्मलेली प्रत्येक पिढी हा चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहते. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी यांनी प्रमुख भूमिका केलेल्या या चित्रपटाची अनेकांनी पारायणे केली असून या चित्रपटातील संवाद आजही अनेकांच्या तोंडपाठ आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटाचा दर्जा या चित्रपटाने वरच्या लेव्हलला नेऊन ठेवला.

ashi-hi-banwa-banwi2

तीन रुपयात तीन कोटी

ऐंशीच्या दशकामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या स्टॉलचे तिकिट 3 रुपये आणि बाल्कनीचे तिकिट 5 रुपये एवढे होते. मात्र त्यावेळीही या चित्रपटाने तब्बल 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आजच्या तिकिटांशी याची तुलना केली तर हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचला असता.

ashi-hi-banwa-banwi4

फ्लॉप चित्रपटाचा रिमेक

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट हिंदीमध्ये फ्लॉप झालेल्या ‘बीवी और मकान’ या ह्रषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाचा मराठी रिमेक आहे. चार तरुण शहरात येतात आणि घर शोधण्यासाठी धडपड करतात. शेवटी फक्त विवाहित जोडप्यांना घर देण्याची अट एक विधवा स्त्री ठेवते, म्हणून यातील दोघे स्त्री म्हणून वावरू लागतात. यातून होणारी गंमत, फसगत या चित्रपटात दाखण्यात आली आहे.

ashi-hi-banwa-banwi5

गाजलेले संवाद

या चित्रपटातील प्रत्येक संवाद प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाच्या संवादांवरून मीम्स, स्टिकर्स बनवण्यात येतात. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ‘हा माझा बायको पार्वती’, ‘तुम्ही दिलेले 70 रुपये वारले’, ‘हा शुद्ध हलकटपणा आहे माने’ हे संवाद तर प्रत्येकाच्या तोंडपाठ आहेत.

ashi-hi-banwa-banwi1