बिनधास्त ड्रायव्हिंग शिका!

235

>>आशीष भोसले, वाहन प्रशिक्षक

सगळ्यांची हौस भागवता भागवता आजीआजोबांची वाहन चालवण्याची स्वतःची हौस मात्र तशीच राहते. पण कुठल्याही वयात गाडी चालवता येते हे त्यांनी लक्षात ठेवायचं. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. जसं आईपणाचं वय वाढलं आहे, तसंच गाडी शिकणाऱया हौशी आजीआजोबांचंही वय वाढलं आहे. त्यामुळे अशा आजीआजोबांनी आता कोणतीही भीती मनात न बाळगता बिनधास्त गाडी शिकून आपली हौस पूर्ण करायला हवी. फक्त काही गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहा म्हणजे झालं

वयाच्या साठीनंतरही आजी आजोबा गाडी शिकू शकतात. फक्त त्यांना शिकण्यासाठी थोडा वेळ लागतो इतकंच. कारण वयोमानानुसार सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं शक्य नसतं. म्हणून थोडा वेळ जातो. मात्र ज्या आजी-आजोबांना बाईक किंवा स्कुटी चालवता येते त्यांना गाडी चालवताना कुठलीही अडचण येत नाही. वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त नसाल तर गाडी चालविण्याची जोखीम न पत्करणेच चांगले. हौस म्हणून गाडी शिकायला हरकत नाही पण तब्येत ठीक नसताना गाडी चालविण्याची जोखीम पत्करु नये. दृष्टीचा त्रास असेल अशांनी किंवा ज्यांना बीपी आहे त्यांनी गाडी चालविण्याची रिस्क घेऊ नये.

काय काळजी घ्यायची?

> गाडी डाव्या बाजूनेच चालवावी.

> गाडीच्या वेगावर नियंत्रण असायला हवे.

> शिकताना पार्किंग लाईट चालू ठेवावी.

> गाडीवर एल असा सिम्बॉल लिहावा. त्यामुळे समोरच्याला अंदाज येतो चालक शिकावू आहे. त्यामुळे समोरचा आपल्याला हॉर्न न देता पुढे निघून जातो.

> एखाद्या काहनाने उजकीकडे शिरण्याचा संकेत दिला असताना आणि त्यासाठी त्याने काहन रस्त्याच्या जास्तीत जास्त मध्ये गाडी आणली असताना काहन डाक्या बाजूकडे घ्याके. मात्र असे करताना इतर रस्ता कापरणाऱयांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्याकी.

> गाडी चालवायला गेलात की प्रथम गिअर्स, स्टेअरिंग, हॅण्डब्रेक, ब्रेक, क्लच, एक्सिलेटर यांची प्राथमिक माहिती देतात.

> गाडी पहिल्यांदाच हातात घेणार असाल तर मित्र वा कुटुंबीयांकडून गाडी न शिकता प्रत्यक्ष मोटार स्कूलमधून गाडी शिकायला हवी. त्यासाठी जवळपास चांगलं मोटार ट्रेनिंग स्कूल आहे त्याची चौकशी करा.

> गाडी चालवताना सातत्य हवे. गाडी शिकण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असायला हवी. गाडी चालविण्याची भीती वाटत असेल तर नेहमी गाडी चालवा. भीती निघून जाईल. घाबरलात तर गाडी शिकू शकत नाही.

मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये आपल्याला गाडी कशी चालवायची, त्याचे नियम, तंत्र शिकवतात पण जेव्हा आपण त्याचा सराव करुन गाडी चालवू तेव्हाच आपल्याला गाडी शिकता येईल. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अर्ध्यातासासाठी जाऊन गाडी चालवता येते.

> मित्र वा कुटुंबीयांकडून गाडी शिकणं वाईट नाही. पैसे वाचतात आणि हव्या त्या वेळेत गाडी शिकता येते. पण ट्रेनिंग स्कूलमध्ये शिकण्याचा फायदा हा असतो की डाव्या बाजूला बसणाऱया प्रशिक्षकाच्या पायाखालीही ब्रेक, क्लच, एक्सिलेटर असतात. त्यामुळे शिकणाऱयाकडून काही चूक झाली तर तो परिस्थिती सावरुन घेतो.

> ड्रायव्हिंग स्कूलचा कोर्स महिनाभराचा असतो. पण त्यानंतर किमान दोन ते तीन महिने त्यांनी सातत्याने गाडी चालवायला हवी. कारण ड्रायव्हिंग शिकलात, पण नंतर त्याचा सराव केला नाही तर गाडीवर हात साफ होणार नाही.

ओव्हरटेक करू नये

आपल्या ओक्हरटेक करण्यामुळे काहतुकीला अडथळा येणार असेल तर ओव्हरटेक करू नये. काहन अशा जागेकर असेल जेथून पुढचा रस्ता दिसतच नसेल, तर ओव्हरटेक करू नये. आपल्या मागच्या गाडीचा चालक ओक्हरटेक करतोय असे लक्षात आले तरी ओव्हरटेक करण्याची रिस्क घेऊ नये. आपल्या पुढे असलेल्या काहनाच्या चालकाने पुढे काढण्याचा संकेत दिला तरच त्याच्यापुढे आपली गाडी न्यावी.

मध्येच गाडी बंद पडल्यास

इंजीनचा प्रॉब्लेम झाला तर गाडी मध्येच बंद पडू शकते. पण अशावेळी घाबरुन न जाता जवळच्या दोघातिघांच्या मदतीने गाडी ढकलत एका बाजूला न्यावी. कारण मागून येणाऱया गाडीकडून अपघात होण्याची शक्यता असते. पण गाडी चालवताना आपल्याकडून बंद पडली तर शांतपणे गाडी पुन्हा सुरू करायची.

आपली प्रतिक्रिया द्या