अशोक चव्हाणांची पोलिसांच्या माईकवरून सरकारवर टीका!

45

सामना प्रतिनिधी । नांदेड

पोलिसांच्या वॉकीटॉकीच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाषण ठोकले. यावेळी बोलताना चव्हाण चक्क फडणवीस सरकारच टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी वॉकीटॉकी वापरण्याची परवानगी न घेताच गैरवापर केला. नांदेड जिह्यातील भोकरमध्ये हा प्रकार घडला.

पीक विम्याचा अर्ज भरताना भोकर येथे एका शेतकऱ्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट घेतली. त्यानंतर चव्हाण यांनी जमलेल्या शेतकऱ्यासमोर चव्हाण भाषण ठोकले. त्यांनी फडणवीस सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. भाषण करण्यासाठी त्यांनी पोलिसांच्याच वॉकीटॉकी वायरलेस माईकचा वापर केला. विशेष म्हणजे माईकच्या वापरासाठी त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून सरकारवर टीका करण्याचा हा प्रकार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या