अशोक चव्हाण यांची प्रकृती ठणठणीत, मिळाला डिस्चार्ज

2057

राज्य मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना गुरुवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी त्यांना नांदेड येथून मुंबईला नेण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली असून ते आता घरी परतत आहेत.

काही दिवसांपासून ते होम क्वारंटाईन होते. राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांनाही ताप व न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिनाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे काही दिवसांपासून होम क्वारंटाईन होते. रविवारी त्रास वाढल्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेड येथील आशा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या