काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदावरून थोरातांना हटविण्याची मागणी केलेली नाही!

691

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरात यांना हटविण्याबाबत मी मागणी केलेली नाही. यासंदर्भात कोणतेही पत्र काँग्रेसच्या हंमागी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपण पाठविलेले नाही. कोणीतरी जाणीपूर्वक अशा कंडय़ा पिकवत असून पक्षांतर्गत वाद विकोपाला जावा, असा त्यामागे उद्देश असावा, असे काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी कुणाकडे सोपविली जाणार याची उत्सुकता काँग्रेस तसेच राजकीय वर्तुळात आहे. गेल्या आठवडय़ात माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी थोरात यांना प्रदेश अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी एका पत्राद्वारे हायकमांडकडे केल्याची चर्चा होती. यासंदर्भात राजधानी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना चव्हाण यांनी माध्यमांतील बातम्या फेटाळून लावल्या. मला जे सांगायचे ते मी थेट सोनिया गांधी यांना सांगू शकतो त्यासाठी पत्राची काय गरज आहे. माझे तेवढ उत्तम संबंध हायकमांड सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या