गेहलोत यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयांवर आयकर धाडी

1212
ashok-gehlot

राजस्थानमध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलटच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार अडचणीत आले असताना दुसरीकडे आयकर विभागाने गहलोत यांच्या निकटवर्तीयांवर धाडी टाकून आणखी एक धक्का दिला आहे. जयपूर, दिल्ली आणि मुंबई या मार्गावर गेहलोत यांच्या निकटवरतीयांवर आयकर विभागाने छापा टाकला असून त्यातून काही ठोस हाती लागेल असे सांगितले जात आहे.

13 जुलै रोजी, अशोक गहलोत जयपूरमधील मुख्यमंत्री निवासस्थानी आमदारांचा पाठिंबा मिळवून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी आयकर विभागाची टीम त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर छापा टाकत होती. जयपूर, दिल्ली आणि मुंबई येथे आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. जयपूरमधील 20, कोटामध्ये 6, दिल्लीत 8 आणि मुंबईत 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

सीबीडीटी मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 3 व्यावसायिक गटांच्या 33 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी पथकाच्या हाती बनावट कागदपत्रे, डायरी आणि डिजिटल डेटा लागल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या