निर्मात्याने स्वरा भास्करला ‘आंटी’ म्हटलं, दोघांमध्ये तुफान ट्विट युद्धाला सुरुवात

3496

अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असते. ती तिची मते ट्विटरवर मांडते ज्यावरून तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला जातो. मात्र सध्या एका निर्मात्यामध्ये आणि स्वरा भास्करमध्ये तुंबळ ट्विट युद्ध सुरु झालं आहे. याची सुरुवात स्वरा भास्करने केलेल्या एका ट्विटपासून झाली. तिने एक ट्विट केलं होतं, ज्यात तिने दिल्लीत अडकलेल्या उत्तर प्रदेश किंवा बिहारला जायचे असेल तर तपशील द्यावा माझे सहकारी मदत करतील असं म्हटलं होतं.

यावर निर्माते अशोक पंडीत यांनी तिला उत्तर देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की तुम्ही स्वत: तर इतरांना कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला होता आणि आता दुसऱ्यांकडे कागदपत्रे मागता आहात! इतक्या लवकर कशी काय भूमिका बदलू शकता ? हरकत नाही. देर आए दुरुस्त आए !

पंडीत यांच्या या ट्विटनंतर दोघांमधील चकमकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्वराने त्यांना उत्तर देताना म्हटले की अशोक अंकल, तुम्ही सायबर स्टॉकींग का करत आहात? थो़डीतरी लाज बाळगा, मी NRC-NPR साठी कागद दाखवण्याच्या विरोधात होते, ट्रेनचे तिकीट दाखवण्याच्या विरोधात नव्हते.

यावर पंडीत यांनी स्वराला आंटी म्हणत लिहिले की शहरी नक्षलवाद्यांची ही सवयच आहे की उत्तर नसते तेव्हा ते वैयक्तिक हल्ले करायला सुरुवात करतातत.

यावर स्वराने पंडीत यांना उत्तर दिले, ती म्हणाली की मी तुमच्या मुलीसोबत काम केले आहे, यामुळे तुम्हाला अंकल म्हणतेय. तुमच्या मुलीमुळे तुम्हाला मी मान देत आहे. तुम्हाला बहुधा मान मिळण्याची सवय नसावी.

यावर पंडीत यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटलंय की कम्युनिस्टांची ही खासियत आहे की तर्क नसला के ते कुटुंबातील व्यक्तींना मध्ये आणतात.

ट्विटरवर सुरू असलेलं हे शाब्दीत युद्ध क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. स्वरा भास्कर ही तिच्या प्रतिक्रियांवरून संतापलेली वाटत असून ती पंडीत यांना उत्तर देण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या