शुभकारक अशोक

734

जर आर्थिक टंचाई जाणवत असेल तर अशोक वृक्षाची मुळे दुकान किंवा घरातील पवित्र जागी ठेवा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

पती-पत्नीमधील हेवेदावे, भांडण मिटवण्यासाठी अशोकाची सात पाने देवळात ठेवा. पाने वाळल्यास नवीन पाने ठेवा. वाळलेल्या पानांना पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. या उपायामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.

उत्सव, सण किंवा घरात शुभकार्य असल्यास अशोक झाडाच्या पानांचे तोरण दाराला अशा पद्धतीने लावा की, त्या पानांचा स्पर्श घरी येणाऱया पाहुण्यांच्या डोक्याला होईल. यामुळे घरात सुख-शांती नांदते.

दारावर बांधलेले अशोकाच्या पानांचे तोरण सुकले तरीही जोपर्यंत दुसरे मंगलकार्य घरात होत नाही तोपर्यंत नाही काढले तरी चालते.

अशोकाची सुकलेली पानेही खूप लाभदायक असतात. घरात येणारी नकारात्मक स्पंदने या पानांमुळे दूर होतात.

तांब्याच्या लॉकेटमध्ये अशोक झाडाचे बी बांधून घातल्यास प्रत्येक कार्यात सफलता मिळेल. पैशाशी निगडित समस्याही दूर होतील.

दुर्गादेवीच्या भक्तांनी देवीची कृपा संपादन करण्यासाठी अशोक वृक्षाला पाणी घालायला हवे. पाणी घालताना देवीचे ध्यान करावे.

अशोकाची पाने हव्या त्या पद्धतीने डोक्यावर धारण केल्यास कामात यश मिळण्याबरोबरच इतरही लाभ होतात.

या झाडाची साल पाण्यात उकळून प्यायल्याने स्त्र्ायांचे बरेचसे आजार दूर होतात. अशोकारिष्ट हा महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करणारा काढाही अशोकाच्या  सालीपासून बनवला जातो.

अशोकाची फुले वाटून मधाबरोबर खाणे हे स्वास्थ्याकरिता लाभदायक असून थकवा, अनारोग्य इत्यादी प्रकृतीच्या तक्रारींवर हे औषध म्हणजे एक वरदान समजले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या