अश्विनची हरभजन व कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी

20849

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू रविंचंद्रन अश्विन याने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध सुरू झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत खास विक्रम आपल्या नावावर केला. अश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात दोन बळी घेतले. अश्विनसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावब टीम इंडियाने बांगलादेशचा डाव 150 धावांमध्ये कोसळला.

#INDvBAN LIVE – हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

अश्विनने मोमिनूल हक याचा 37 धावांवर त्रिफळा उडवत सामन्यातील पहिला बळी घेतला. यासह घरच्या मैदानावर अश्विनने 250 बळींचा टप्पा गाठला. दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आमि हरभजन सिंह यांच्यानंतर घरच्या मैदानावर 250 बळी घेणारा अश्विन तिसरा गोलंदाज ठरला.

घरच्या मैदानावर सर्वाधिक बळी घेणाऱ्या कुंबळे आघाडीवर असून त्याने 63 कसोटीत 350 बळी घेतले, तर हरभजनने 55 कसोटीत 265 बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनला हरभजनचा विक्रम मोडण्याची नामी संधी आहे.

हिंदुस्थानकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज –
अनिल कुंबळे – 619
कपिल देव – 434
हरभजन सिंह – 417
आर. अश्विन – 358*

आपली प्रतिक्रिया द्या