अश्विनी भावेंच्या या फोटोमागे नेमकं दडलंय काय?

45

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकतंच एक फोटोशूट केलं आणि त्यातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. फोटोमध्ये त्या खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहेत. आजच्या कित्येक अभिनेत्रींच्या सौंदर्याला मात देईल असा त्यांचा तो फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण या फोटोमागे काहीतरी गुपित दडलं आहे. ते काय.. याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.

पण, या फोटोची चर्चा सगळीकडे होत असून अश्विनी नेमकं काय करणार आहेत? त्यांचा नवीन चित्रपट येत आहे का?? की त्या काही नवीन उपक्रम करणार आहेत? याची चर्चा सध्या चित्रपट वर्तुळात रंगली आहे. अर्थात याचं उत्तर मिळण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या