Asia Cup 2018 : स्पर्धा सुरु होण्याआधीच धक्का, मोठा खेळाडू बाहेर

550

सामना ऑनलाईन । मुंबई

आशिया कप स्पर्धा सुरू होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. उद्या (15 सप्टेंबर) बांगलादेश आणि श्रीलंकेच्या संघामध्ये पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज धनुष्का गुणतिलका पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहे.

Asia Cup : महामुकाबला! हिंदुस्थान पाकिस्तानशी भिडणार, वाचा खास बाबी…

सामन्यापूर्वी सरावादरम्यान श्रीलंकेचा 27 वर्षीय सलामीवर धनुष्का गुणतिलकाच्या पाठीला दुखापत धाली. त्यामुळे उपचारासाठी तो मायदेशी परतणार आहे. त्याच्या जागी श्रीलंकेने डावखुरा फलंदाज शेहान जयसूर्या याचा संघात समावेश केला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमल देखील बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. अशातच सलामीचा फलंदाज धनुष्का देखील स्पर्धेला मुकणार असल्याने श्रीलंकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेसाठी जमेची बाजू म्हणजे वेगवान गोलंदाज लसिथ मलिगाचा एक वर्षानंतर संघात समावेश करण्यात आला असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.

आशिया कप स्पर्धा 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत यंदा 6 संघ सहभागी होणार असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप ए मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान आणि हॉन्गकॉन्गचा समावेश आहे तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगानिस्तानचा समावेश आहे.

श्रीलंकेचा आशिया कपमधील रेकॉर्ड
हिंदुस्थानंतर सर्वाधिकवेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. हिंदुस्थानने सहा वेळी तर श्रीलंकेने पाच वेळा (1986, 1997, 2004, 2008 आमि 2014) आशिया कपवर कब्जा केला आहे. आशिया कपमध्ये श्रीलंकेने आतापर्यंत 52 सामने खेळले असून यात 35 विजय आणि 17 पराभव स्वीकारले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या