UNSC मध्ये हिंदुस्थानला अस्थायी सदस्यत्व मिळण्याचा मार्ग प्रशस्त

22

सामना ऑनलाईन, जिनिव्हा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये म्हणजेच UNSC मध्ये हिंदुस्थानला अस्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी आशिया-पॅसिफिक समूहाने पाठिंबा दर्शवला आहे. हा हिंदुस्थानच्या कूटनीतीचा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. सुरक्षा परिषदेत हिंदुस्थानला 2 वर्षांसाठी सदस्यत्व मिळावं यासाठी आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते समर्थन दिले आहे.

2021-2022 या दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेवर 5 अस्थायी सदस्य निवड करण्याची प्रक्रिया जून 2020 ला होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये हिंदुस्थानला पाठिंबा देण्याचा निर्णय आशिया-पॅसिफिक समूहाने सर्वानुमते घेतला आहे. याबाबतची माहिती हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटद्वारे दिली आहे. हिंदुस्थानला पाठिंबा देणाऱ्या आशिया-पॅसिफिक समूहामध्ये एकूण 55 देशांचा समावेश असून यात श्रीलंका, सोदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान, सिरियासह पाकिस्तानचाही समावेश आहे. हिंदुस्थान आतापर्यंत 7 वेळा अस्थायी सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर निवडून गेला आहे. हिंदुस्थानला हे अस्थायी सदस्यत्व शेवटचे 2011-12 साली मिळाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या