आशियाई संघात हिंदुस्थानचे स्टार खेळाडू; धवन, शमी, पंत, कुलदीप यांचा समावेश

359

आशियाई इलेव्हन व जागतिक इलेव्हन यांच्यामध्ये 21 व 22 मार्च रोजी दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी आशियाई इलेव्हन संघामध्ये हिंदुस्थानच्या सहा क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून दोन्ही संघांतील संभाव्य खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत, कुलदीप यादव व मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश आहे. बांगलादेशचे शेख मुजीबुर रहमान यांच्या शतक महोत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

खेळाडूंशी करार अद्याप झालेला नाही पण…

हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएलला सुरुवात होईल. या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे बांगलादेशातील टी-20 मालिकेत हिंदुस्थानचे किती खेळाडू खेळतील यावरही प्रश्नचिन्ह आहे. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, खेळाडूंसोबत अद्याप करार झालेला नाही, पण रिषभ पंत, कुलदीप यादव, शिखर धवन व मोहम्मद शमी या चार खेळाडूंचा समावेश जवळपास निश्चित आहे.

  • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व स्टार खेळाडू लोकेश राहुल हे दोन्ही खेळाडू प्रत्येकी एक सामना खेळतील अशी आशा बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात विराट कोहली कोणता निर्णय घेतोय यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विराट कोहलीच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

संभाव्य संघ खालीलप्रमाणे

आशियाई इलेव्हन संघ -लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, राशीद खान, मुजीब उर रहमान, मुस्तफिजुर रहमान, तमिम इक्बाल, मुशफिकर रहीम, लिटन दास, संदीप लॅमीचाने, महमुद्दूलाह.

जागतिक इलेव्हन संघ – ऍलेक्स हेल्स, ख्रिस गेल, फाफ डय़ुप्लेसिस, निकोलस पूरण, ब्रेन्डन टेलर, जॉनी बेअरस्टॉ, कायरॉन पोलार्ड, शेल्डॉन कॉटरेल, लुंगी एनगिडी, ऍण्ड्रय़ू टे, मिचेल मॅकलेनघन.

आपली प्रतिक्रिया द्या