हिंदुस्थानची ‘नौका’ पार… पटकावलं 1 सुवर्ण, 2 कांस्य

quadruple-sculls-rowing
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरू आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नौकायनमध्ये हिंदुस्थाननं एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदक पटकावली आहेत. नौकायनच्या पुरुष गटातील क्वाड्रपल स्कल्स या क्रीडा प्रकारात हिंदुस्थाननं चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर नौकायनच्या पुरुष गटातील लाईटवेट डबल स्कल प्रकारात हिंदुस्थानच्या रोहित कुमार आणि भगवान दास यांनी कांस्य पदक पटाकवलं आहे. यासोबतच दुष्यंत चौहान यानं कांस्य पदक पटकावलं.

या क्रीडाप्रकारात गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला पदक पटकावता आलं नव्हतं. पण यंदा मात्र रोहित कुमार आणि भगवान दास यांनी चांगली कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. या दोन पदकांनंतर हिंदुस्थानची पदक संख्या 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 11 कांस्य अशी झाली आहे.

दरम्यान, याआधी दुष्यंत चौहान यांनं पुरुष गटातील लाईट वेट सिंगल स्कल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.