
हिंदुस्थानच्या नेहा ठाकूरनं आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये मुलींच्या डिंगी ILCA4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. हे नौकानयनातील हिंदुस्थानचं पहिलं पदक आहे. तर या पदकासह हांगझोऊ गेम्समध्ये हिंदु्स्थानचं एकूण 12 वं पदक आहे.
नॅशनल सेलिंग स्कूल भोपाळमधून शिकणाऱ्या, नेहानं एकूण 32 गुणांसह हा पराक्रम केला. थायलंडच्या सुवर्णपदक विजेत्या नोप्पासोर्न खुनबुंजनं पाठोपाठ तिनं रौप्य पदक पटकावलं. नेहाच्या तुलनेत एक गुण कमी असल्यानं सिंगापूरच्या कियारा मेरी कार्लाइलला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.