
हिंदुस्थानच्या पुरुषांच्यां 10 मीटर एअर रायफल संघानं आशियाई खेळ 2023 मध्ये देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे.
रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पनवार आणि ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर यांचा समावेश असलेल्या या संघानं हिंदुस्थानला या खेळातील केवळ पहिलं सुवर्णपदकच जिंकून दिलं नाही तर या प्रक्रियेत जागतिक विक्रमही मोडीत काढला.
First 🥇 for #IndiaAtAG22
Gold Medal & a new World Record set by our #TeamIndia trio @DivyanshSinghP7, @RudrankkshP & Aishwary Pratap Singh Tomar in the 10m Air Rifle Men’s Team Event. Best wishes to them for the individual finals starting shortly!#Cheer4india #WeAreTeamIndia pic.twitter.com/jEhJyEoiDY
— Team India (@WeAreTeamIndia) September 25, 2023
या तिघांनी वैयक्तिक पात्रता फेरीत एकूण 1893.7 गुणांची कमाई केली, ज्याने त्या वर्षाच्या सुरुवातीला बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेल्या मागील विश्वविक्रमाला मागे टाकले. दक्षिण कोरिया 1890.1 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीन 1888.2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रुद्रांक्षने संघासाठी 631.6 गुण मिळवले. ऐश्वरीने 631.6 गुण नोंदवले तर दिव्यांशने 629.6 गुण मिळवले.