Asian junior boxing championship 2019 हिंदुस्थानी खेळाडूंचा दमदार पंच

383

हिंदुस्थानच्या सीनियर खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर युएई येथे झालेल्या आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करीत आपला ठसा उमटवला. हिंदुस्थानच्या मुलींनी 13 व मुलांनी आठ पदकांवर मोहोर उमटवली. त्यामुळे एकूण 21 पदकांसह हिंदुस्थानने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

हिंदुस्थानने या स्पर्धेत एकूण सहा गोल्ड मेडल्स जिंकले. यामध्ये मुलींनी चार तर मुलांनी दोन सुवर्ण पदकांवर नाव कोरले. महाराष्ट्राच्या अल्पिया पठाण हिने 81 किलोपेक्षा अधिक वजनी गटात गोल्ड मेडल पटकावले. शर्वरी कल्याणकर हिने 70 किलो वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली.

सुवर्ण पदक विजेते

  • कल्पना (46 किलो, हरयाणा)
  • प्रीती दहीया (60 किलो, हरयाणा)
  • तनीशबीर कौर संधू (80 किलो, पंजाब)
  • अल्फिया पठाण (81किलोपेक्षा अधिक, महाराष्ट्र)
  • सुरेश विश्वनाथ (46 किलो)
  • विश्वमित्र चोंगथाम (48 किलो)
आपली प्रतिक्रिया द्या