आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप – विनेश, अंशूचा सुवर्ण धमाका

टोकियो ऑलिम्पिकची तयारी करीत असलेल्या हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट व अंशू मलिक यांनी शुक्रवारी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंना चीतपट करताना आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. हे दोघींचे या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक ठरले हे विशेष.

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये चीन व जपानचे कुस्तीपटू सहभागी झाले नव्हते, मात्र विनेश फोगाट हिने या स्पर्धेकडे गांभीर्याने लक्ष दिले. तिने 53 किलो वजनी गटात एकही गुण न गमावता सुवर्ण पदक जिंकले. विनेश फोगाट हिने फायनल लढतीत तैपेईच्या मेंग सुआन सिह हिला 6-0 अशा फरकाने पराभूत करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

हिंदुस्थानची 19 वर्षीय युवा कुस्तीपटू अंशू मलिक हिने 57 किलो वजनी गटात देदीप्यमान कामगिरी केली. तिने मंगोलियाच्या बेतसेतसेग अलतानसेतसेग हिला 3-0 अशा फरकाने हरवून आपली धमक दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या