हिंदुस्थानला चार कास्य पदके; अशू, आदित्य व हरदीपने गाजवला दिवस

220

सुनीलकुमारने ग्रीको रोमन कुस्तीत हिंदुस्थानला तब्बल 27 वर्षांनंतर गोल्ड मेडल जिंकून दिल्यानंतर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये यजमान देशाने आणखी चार पदकांवर मोहोर उमटवली. अशू, आदित्य कुंडू, अर्जुन हलाकुरकी आणि हरदीप यांनी कास्य पदकांवर नाव कोरले.

अशूने 67 किलो वजनी गटात सीरियाच्या मोहम्मद हसनचा 8-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि तिसऱया स्थानावर झेप घेतली. आदित्य कुंडूने 72 किलो वजनी गटात जपानच्या नाओ कुसाकाला 8-0 अशा फरकाने अवघ्या दीड मिनिटात चीतपट केले.

अर्जुन हलाकुरकी याने 55 किलो वजनी गटात हिंदुस्थानला कास्य पदक मिळवून दिले. हरदीप याने 97 किलो वजनी गटात देशाला बुधवारी शेवटचे पदक जिंकून दिले. हे हिंदुस्थानचे स्पर्धेतील चौथे कास्य पदक ठरले. दरम्यान, ग्यानेंदरला 60 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या