आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे सोमवारी सायंकाळी येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

गोगोई यांच्या निधनाबद्दल आसाम सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या