आसामच्या गुवाहाटीत भीषण अपघात, सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

आसामच्या गुवाहाटी येथे एका भीषण अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंग विभागाचे होते. गुवाहाटी येथील जलुकबारी परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून तेही विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.

इंजिनियरिंग कॉलेजचे 10 विद्यार्थी स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. ही गाडी अनियंत्रित होऊन रस्ते दुभाजकावर आदळली आणि नंतर जालुकबाडी उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका पिकअप टेम्पोला धडकली. या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी सात जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.