पृथ्वीवरच्या खाणी संपल्या, आता डोळा लघुग्रहांवर

65

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

पृथ्वीवर सोने, कोळसा किंवा मौल्यवान धातू शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खाणकाम झाले. जमिनीची अक्षरश: चाळण झाली. पण,एवढय़ाने मानवाचे मन भरलेले नाही तर आता त्याचा डोळा लघुग्रहावर आहे. लघुग्रहावर खाणकाम करून  गडगंज पैसा कमवून सर्वात श्रीमंत होण्याचा मार्ग अमेरिकेतील गोल्डमॅन सॅच्स या गुंतवणूक सल्लागार कंपनीने शोधून काढला आहे. लघुग्रहातील मोल्यवान धातू किंवा खनिजे या खाणकामातून शोधण्यात येणार आहेत. त्यासाठी गोल्डमॅन सॅच्स ही कंपनी अंतराळात यानही पाठवणार आहे.

लघुग्रहांमध्ये असे काय आहे ?

अंतराळात फिरणाऱ्या या लघुग्रहांमध्ये प्लॅटीनम, लोह,कार्बन, कोबाल्ट, ऱहोडीयम, निकेल आणि इरीडीयम आणि आणखी काही खनिजे आहेत. ही खनिजे अतिशय मौल्यवान आहेत. त्यामुळे आता या लघुग्रहांमध्ये खाणकाम करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

प्लॅटिनम सगळ्यात महागडे खनिज

प्लॅटीनम हे सगळ्यात महागडे खनिज असून त्याचा वापर मुख्यत: विविध प्रकारचे संशोधन आणि दागिन्यांमध्ये होतो. त्यामुळे प्लॅटिनमचा व्यापार हा मोठा नफा मिळवून देणारा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जोखमीचे आणि खर्चिक काम

लघुग्रहांना खोदून त्यातून मौल्यवान खनिजे शोधून काढणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. या मोहिमेसाठी तयार करण्यात येणाऱया यानाचा खर्च २.६ अब्ज डॉलर असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जगात सध्या अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेझॉस ही पहिली श्रीमंत व्यक्ती आहे. पण,लघुग्रहांमधून मिळणाऱ्या खनिजांमुळे गोल्डमॅन कंपनी तब्बल १ ट्रीलयिन अमेकिन डॉलरपेक्षाही अधिक संपत्ती मिळवू शकेल असा अंदाज आहे.

गोल्डमॅन ही गूंतवणूक सल्लागार कंपनी आहे. याशिवाय मल्टीनॅशनल गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा पुरवठादार कंपनी आहे.

यापुढे अंतराळात लघुग्रहांमध्ये किंवा ग्रहांमध्ये लपलेल्या खनिजांसाठी होण्याची शक्यता आहे. सर्व देश आपली शक्ती पणाला लावून अंतराळात आपला मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नील डीग्रास (खगोलभौतिकतज्ञ)

आपली प्रतिक्रिया द्या