तरुणीला धमकावणाऱ्या ज्योतिषाचे ग्रह फिरले

ग्रहाच्या अंगठीच्या नावाखाली तरुणीला पैशांसाठी धमकावणाऱ्या ज्योतिषाला गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने अटक केली आहे. हा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदार तरुणी ही कांदिवली परिसरात राहते. 2016 मध्ये तिची एकासोबत ओळख झाली होती. विधी आणि अंगठीकरिता 50 हजार रुपये खर्च असून काही रक्कम रोख आणि उर्वरित रकम चेकने दे असे सदर तरुणीला सांगितले.

जुलै महिन्यात तरुणीने  दिलेला चेक वटला नसल्याने  तो तरुणीला पैशांसाठी सतत फोन करत होता. अखेर तिने चारकोप पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्हय़ाचा तपास युनिट 11 कडे सोपवला. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, रईस शेख, शरद झिने, मसवेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान एकाला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले.

आपली प्रतिक्रिया द्या